Mosquito Repellent Plants: गरमी वाढली की आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या तर होतातच, सोबतच डासांची त्रासही खूप वाढतो. रात्री डास इतका हैदोस घालतात की, झोपही येत नाही. मग काय दुसऱ्या दिवशी एकही काम धड होत नाही. डास फक्त चावून झोपमोड करत नाहीत तर गंभीर आजारही देऊन जातात. डेंग्यू-मलेरियासारखे आजार होतात. बरं डास पळवण्यासाठी लोक वेगवेगळे महागडे उपाय करतात, पण डास काही वेळासाठी गायब होतात आणि पुन्हा येतात. अशात एक सोपा उपाय आपण करू शकता. तो म्हणजे घरात काही झाडी लावणं. अशी काही झाडं असतात जी डासांना अजिबात आवडत नाही किंवा असंही म्हणू शकता की, ही झाडी जर घरात लावली तर डास येणारच नाहीत.
डास पळवणारी ३ झाडं
तुळशी
तुळशीमध्ये खूपसारे आरोग्यदायी गुण असतात. सोबतच हे एक असं झाड आहे ज्याने डासही घरापासून दूर राहतात. तुळशीचा सुगंध डासांना आवडत नाही. जर दारात किंवा खिडकीमध्ये हे झाड लावलं तर डास घरात येणार नाहीत. सोबतच या झाडांनी घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं.
पुदिना
पुदिन्याचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पुदिन्याच्या रोपांमुळे डासही पळून जातात. पुदिन्याचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. जर आपल्याला रोप लावायचं नसेल तर पुदिन्याच्या पानांची पेस्ट तयार करून खिडकीजवळ ठेवा. हा उपाय केल्यासही डास पळून जातील.
झंडूची फुलं
झंडूच्या फुलांचा वापर नेहमीच पूजेसाठी केला जातो किंवा मग सजावटीसाठी केला जातो. पण सोबतच या फुलांचा फायदा डास पळवण्यासाठी सुद्धा होतो. कारण डासांना या फुलांचा सुगंध अजिबात आवडत नाही. झंडूचं झाड आपण बाल्कनीमध्ये सहज लावू शकता. तसेच घराच्या मेन गेटमध्ये किंवा खिडकीत ठेवाल तर डास घरात येणार नाहीत.
