Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > बिनउसाचा रस.. गुऱ्हाळात न जाता रस पिण्याची हुक्की आली की ५ मिनिटात करा गारेगार रस घरीच

बिनउसाचा रस.. गुऱ्हाळात न जाता रस पिण्याची हुक्की आली की ५ मिनिटात करा गारेगार रस घरीच

Make sugarcane juice at home , easy and tasty 5 minutes recipe : उसाचा रस घरीच करा ५ मिनिटांत. पाहा सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2026 18:15 IST2026-05-07T18:08:00+5:302026-05-07T18:15:10+5:30

Make sugarcane juice at home , easy and tasty 5 minutes recipe : उसाचा रस घरीच करा ५ मिनिटांत. पाहा सोपी रेसिपी.

Make sugarcane juice at home , easy and tasty 5 minutes recipe | बिनउसाचा रस.. गुऱ्हाळात न जाता रस पिण्याची हुक्की आली की ५ मिनिटात करा गारेगार रस घरीच

बिनउसाचा रस.. गुऱ्हाळात न जाता रस पिण्याची हुक्की आली की ५ मिनिटात करा गारेगार रस घरीच

उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस प्यायची इच्छा अनेकांना होते. गोड चव आणि शरीराला मिळणारा थंडावा यामुळे उसाचा रस हा आवडीचा पेय प्रकार मानला जातो. मात्र प्रत्येक वेळी बाहेर जाऊन रस पिणे शक्य होत नाही. अशावेळी घरात असलेल्या गुळापासूनही उसाच्या रसासारखे चविष्ट आणि ताजेतवाने सरबत तयार करता येते. (Make sugarcane juice at home , easy and tasty 5 minutes recipe )गूळ हा उसापासूनच तयार होत असल्यामुळे त्याची चव नैसर्गिक गोड आणि मातीचा हलका स्वाद असलेली वाटते. त्यामुळे गुळाचे सरबत प्यायल्यावर अनेकांना ऊसाच्या रसाची आठवण येते. विशेष म्हणजे हे पेय घरच्या घरी पटकन तयार करता येते आणि उन्हामुळे आलेला थकवाही कमी करण्यास मदत करते.

गुळामध्ये लोह, खनिजे आणि शरीराला ऊर्जा देणारे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात थकवा, अशक्तपणा किंवा घामामुळे आलेला थकवा कमी होतो. उष्णता जास्तच जाणवत असेल तर गुळाचे सरबत उपयोगी ठरू शकते. काही लोक यात लिंबाचा रस, आले किंवा पुदिन्याची चव घालून ते आणखी फ्रेश तयार करतात. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य 
गूळ, पुदिना, पाणी, सैंधव ,मीठ, बर्फ, लिंबू 

कृती
१.  गूळ बारीक चिरुन घ्यायचा किंवा त्याचे तुकडे घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात गूळ घ्यायचा. पुदिन्याची ताजी पाने निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायची. पुदिन्याची पानेही मिक्सरच्या भांड्यात घालायची. आवडीनुसार बर्फाचे तुकडे घालायचे.

२. त्यात थोडं पाणी घालायचं. त्याची वाटून पेस्ट तयार करायची. नंतर गरजेनुसार पाणी घालून सरबत करायचे. त्यात थोडा लिंबू पिळायचा. चवीनुसार सैंधव मीठ घालायचे. ढवळून घ्यायचे. त्यात बर्फाचा खडा घाला. नाही घातला तरी चालेल. गरेगार प्या. चवीला अगदी ऊसाच्या रसासारखेच लागते. 

Web Title : बिना गन्ने का रस: घर पर 5 मिनट में बनाएं ठंडा रस

Web Summary : गन्ने के रस की तलब? गुड़, पुदीना और नींबू का उपयोग करके घर पर मिनटों में ताज़ा, ठंडा पेय बनाएं। यह सरल रेसिपी एक स्वादिष्ट और स्वस्थ विकल्प प्रदान करती है, जो गर्मी को मात देने के लिए एकदम सही है।

Web Title : Make sugarcane juice at home in 5 minutes without sugarcane.

Web Summary : Craving sugarcane juice? Make a refreshing, cooling drink at home in minutes using jaggery, mint, and lemon. This simple recipe offers a tasty and healthy alternative, perfect for beating the summer heat.