Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चपातीपेक्षा भात लवकर पचतो माहीत असेलच, पण दोन्ही पचायला नेमका वेळ किती लागतो?

चपातीपेक्षा भात लवकर पचतो माहीत असेलच, पण दोन्ही पचायला नेमका वेळ किती लागतो?

Roti and Rice Digestion Facts: हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भलेही भात लवकर पचतो, पण चपाती खाणंही महत्वाचं आहे. जर दोन्ही गोष्टींचं योग्य प्रमाणात खाल्ल्या तर शरीराला जास्त फायदे मिळतील. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:01 IST2026-04-15T09:00:40+5:302026-04-15T09:01:05+5:30

Roti and Rice Digestion Facts: हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भलेही भात लवकर पचतो, पण चपाती खाणंही महत्वाचं आहे. जर दोन्ही गोष्टींचं योग्य प्रमाणात खाल्ल्या तर शरीराला जास्त फायदे मिळतील. 

How long roti and rice take to digest, know what expert says | चपातीपेक्षा भात लवकर पचतो माहीत असेलच, पण दोन्ही पचायला नेमका वेळ किती लागतो?

चपातीपेक्षा भात लवकर पचतो माहीत असेलच, पण दोन्ही पचायला नेमका वेळ किती लागतो?

Roti and Rice Digestion Facts: जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये चपाती आणि भात आपल्या आहारातील महत्वाचा भाग असतात. तर कुठे असंही बघायला मिळतं की, काही लोकांना फक्त चपाती आवडतात, तर काहींना भात. पण जास्तीत जास्त लोक चपाती आणि भाग एकत्र खातात. चपाती आणि भातासंबंधी नेहमी प्रश्न समोर येतो की, दोन्हीपैकी काय लवकर पचन होतं आणि काय पचायला जास्त वेळ लागतो. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भलेही भात लवकर पचतो, पण चपाती खाणंही महत्वाचं आहे. जर दोन्ही गोष्टींचं योग्य प्रमाणात खाल्ल्या तर शरीराला जास्त फायदे मिळतील. 

भात पचायला किती वेळ लागतो? 

डाएटिशिअन सांगतात की, सामान्यपणे भात पचायला १ ते २ तासांचा वेळ लागतो. खासकरून पांढरा भात लवकर पचतो, कारण यात फायबर कमी असतं. भात पोटात गेल्यावर लगेच ग्लूकोजमध्ये बदलतो. हेच कारण आहे की, आजारी किंवा कमजोर लोकांना नेहमी भात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण तो पोटासाठी हलका असतो आणि लवकर एनर्जी देतो. ब्राउन राइसमध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त फायबर असतं. त्यामुळे ते पचायला जड असतात. तरी सुद्धा चपातीच्या तुलनेत भात लवकर पचतो.

चपाती पचायला किती वेळ लागतो? 

डाएटिशिअन सांगतात की, गव्हाची पचायला थोडा जास्त वेळ लागतो. कारण यात फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे चपाती पूर्णपणे पचायला साधारण ३ ते ४ तासांचा वेळ लागतो. चपातीने हळूहळू एनर्जी मिळते आणि जास्त वेळ पोट भरलेलं राहतं. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा जास्त वेळ एनर्जी हवी असेल तर त्यांच्यासाठी चपाती बेस्ट पर्याय आहे. मल्टीग्रेन किंवा बाजरीची भाकरी गव्हाच्या चपातीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पचन होते. बाजरी गव्हापेक्षा जास्त पौष्टिक असते. त्यामुळे चपाती किंवा भाकरी कोणत्या धान्याची खाताय त्याचाही पचनक्रियेवर प्रभाव पडतो.

खाण्याच्या योग्य सवयी सुद्धा महत्वाच्या

आपण जे काही खातो त्याचा आपल्या लाइफस्टाईलवरही प्रभाव पडतो. जर आपण शांतपणे हळूहळू एक एक घास बारीक चावून खात असाल, संतुलित आहार घेत असाल तर पचन अधिक चांगलं होतं. तेच दुसरीकडे तळलेले, भाजलेले किंवा जड पदार्थ खाल्ले ते पचनक्रिया स्लो होते. जे लोक फिजिकली अॅक्टिव राहतात, त्यांची पचनक्रिया लवकर होते. पण जे लोक तासंतास एकाच जागी बसून काम करतात, त्यांचं पचन स्लो होतं. त्यामुळे लाइफस्टाईल अॅक्टिव असणंही गरजेची आहे. 

Web Title : रोटी बनाम चावल: पाचन समय और क्या है आसान?

Web Summary : चावल कम फाइबर के कारण तेजी से (1-2 घंटे) पचता है, त्वरित ऊर्जा प्रदान करता है। जटिल कार्बोहाइड्रेट के कारण रोटी को अधिक समय (3-4 घंटे) लगता है, जिससे ऊर्जा बनी रहती है। दोनों के फायदे हैं; बेहतर स्वास्थ्य और पाचन के लिए संतुलन महत्वपूर्ण है। जीवनशैली भी पाचन को प्रभावित करती है।

Web Title : Chapati vs. Rice: Digestion Time and Which is Easier?

Web Summary : Rice digests faster (1-2 hours) due to less fiber, providing quick energy. Chapati takes longer (3-4 hours) because of complex carbohydrates, offering sustained energy. Both have benefits; balance is key for optimal health and digestion. Lifestyle impacts digestion too.