उन्हाळा आला की बाजारात आंब्यांची रेलचेल सुरू होते. गोड, रसाळ आंबे पाहिले की खरेदीचा मोह आवरत नाही. आंबा तर खायलाच हवा पण अनेकदा आंबे कृत्रिमरीत्या पिकवलेले असतात. काही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडसारख्या केमिकलचा वापर करून आंबे लवकर पिकवतात.(Before buying Mangoes think about quality , never buy just by looking at it, see how to identify good fruit) असे आंबे दिसायला आकर्षक असले तरी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे आंबा नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे की केमिकलयुक्त हे ओळखणे महत्त्वाचे ठरते.
आंबा ओळखण्यासाठी घराघरात वापरला जाणारा एक सोपा उपाय म्हणजे लिंबाचा वापर. आंब्याच्या सालीवर थोडा लिंबाचा रस लावून काही मिनिटे ठेवतात. जर सालावर काळपट डाग पटकन दिसू लागले किंवा विचित्र वास आला तर तो आंबा कृत्रिमरीत्या पिकवलेला असण्याची शक्यता असते. आंब्याच्या देठाजवळ लिंबाचा रस लावायचा. त्या भागाचा रंग बदलतो जर रंग बदलला तर त्यात रसायने भरपूर आहेत. हा उपाय अनेक लोक घरच्या घरी करून पाहतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याचा वास. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला देठाजवळ गोड आणि ताजा सुगंध येतो. केमिकलने पिकवलेल्या आंब्याला अनेकदा वास फार कमी येतो किंवा थोडासा औषधासारखा जाणवतो. त्यामुळे आंबा घेताना फक्त रंग पाहू नका, तर त्याचा वासही घ्या. आई- बाबा आंबा विकत घेताना देठाचा वास घेतात कारण त्यावरुन आंब्याचा दर्जा ओळखता येतो.
तिसरा उपाय म्हणजे आंबा पाण्यात टाकून पाहणे. अनेक लोक हा पारंपरिक उपाय वापरतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा ठेवा. नैसर्गिक आंबा सहसा खाली बसतो, तर काही कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे हलका असल्याने वर तरंगतो. अगदी तरंगत नाही मात्र तळाशी जात नाही. हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर नसला तरी प्राथमिक अंदाज देऊ शकतो.
महत्वाचे म्हणजे खुपच आकर्षक आणि पूर्ण दाग नसलेला आंबा दिसायला सुंदर म्हणून आपण विकत घेतो.पण खूप चमकदार, एकसारखा पिवळा रंग असलेला आंबा घेताना काळजी घ्या. नैसर्गिक आंब्यावर हिरवट किंवा वेगवेगळ्या छटा दिसू शकतात काळे डाग पडतात कारण त्यावर उन्हाचा मारा झालेला असतो. पण रंगाला पूर्ण पिवळा आणि भरगच्च दिसणारा आंबा केमिकल भरुन आकर्षक केलेला असतो. त्यामुळे आंबा कसा दिसतो यापेक्षा खरंच कसा आहे याची खात्री करा. आंबा खाण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने धुणे आणि काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणेही चांगले ठरते. योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्यातील आंब्याचा आनंद आरोग्य बिघडवता सुरक्षितपणे घेता येतो.
