Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > आठवड्यातून किती वेळा केस शाम्पू करावेत किंवा धुवायला हवेत? माहीत असेल तर रहाल फायद्यात...

आठवड्यातून किती वेळा केस शाम्पू करावेत किंवा धुवायला हवेत? माहीत असेल तर रहाल फायद्यात...

Hair Care Tips : आठवड्यातून किती वेळा केस धुवावे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण रोज केस धुतल्याने सुद्धा ते डॅमेज होण्याचा किंवा रफ होण्याची धोका असतो. त्याशिवाय केस गळण्याचा सुद्धा धोका असतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:07 IST2026-05-07T12:06:38+5:302026-05-07T12:07:44+5:30

Hair Care Tips : आठवड्यातून किती वेळा केस धुवावे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण रोज केस धुतल्याने सुद्धा ते डॅमेज होण्याचा किंवा रफ होण्याची धोका असतो. त्याशिवाय केस गळण्याचा सुद्धा धोका असतो. 

How many times a week should you shampoo or wash your hair? | आठवड्यातून किती वेळा केस शाम्पू करावेत किंवा धुवायला हवेत? माहीत असेल तर रहाल फायद्यात...

आठवड्यातून किती वेळा केस शाम्पू करावेत किंवा धुवायला हवेत? माहीत असेल तर रहाल फायद्यात...

Hair Care Tips : उन्हाळ्यात केसांसंबंधी अनेक समस्या होतात. घामामुळे केस कमजोर होतात आणि तुटू लागतात. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, या दिवसांमध्ये आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवेत? सामान्यपणे पुरूष आंघोळीवेळी रोज केस धुतात, तर महिलांना रोज केस धुणं शक्य होत नाही. अशात त्यांनी आठवड्यातून किती वेळा केस धुवावे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण रोज केस धुतल्याने सुद्धा ते डॅमेज होण्याचा किंवा रफ होण्याची धोका असतो. त्याशिवाय केस गळण्याचा सुद्धा धोका असतो. 

कितीवेळा धुवावे केस?
 
केस निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा शाम्पू करणे फायदेशीर मानले जाते. जर तुमची स्कॅल्प म्हणजे डोक्याची त्वचा ऑयली असेल, तर एक दिवसाआड केस धुवू शकता. कोरडे आणि कुरळे केस असतील, तर आठवड्यातून १ ते २ वेळा केस धुणे पुरेसे असते. निरोगी केसांसाठी माइल्ड किंवा नैसर्गिक शॅम्पूचा वापर करणे अधिक चांगले ठरते.

शाम्पू करण्याची योग्य पद्धत

शाम्पू कधीही थेट डोक्यावर लावू नये. एका छोट्या भांड्यात थोडे पाणी आणि थोडासा शाम्पू घेऊन ते नीट मिसळा. त्यानंतर हे मिश्रण स्कॅल्पवर हलक्या हाताने लावा. जास्त प्रमाणात शाम्पू वापरल्याने केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. तसेच, केस गळण्याची समस्याही वाढू शकते.

केसांना तेल लावा

शाम्पू करण्याच्या आदल्या रात्री केसांना आणि स्कॅल्पला तेल लावणे खूप महत्त्वाचे असते. तेलाने मसाज केल्यामुळे केसांना आतून पोषण मिळते. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, तर केस धुण्याच्या १ ते २ तास आधीही तेल लावू शकता. आजी-आजोबांच्या काळापासून केसांच्या पोषणासाठी तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title : स्वस्थ बालों के लिए कितनी बार शैम्पू करें? जानिए सही तरीका

Web Summary : सप्ताह में 2-3 बार बाल धोना स्वस्थ रखता है। तैलीय स्कैल्प के लिए एक दिन छोड़कर धोना फायदेमंद है। रूखे बालों को कम धोने की आवश्यकता होती है। पोषण के लिए हल्के शैम्पू और तेल का नियमित उपयोग करें।

Web Title : Hair Washing Frequency: How Often to Shampoo for Healthy Hair?

Web Summary : Washing hair 2-3 times a week keeps it healthy. Oily scalps benefit from alternate-day washing. Dry hair needs less. Use mild shampoo and oil hair regularly for nourishment.