आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 18:47 IST2024-09-17T18:45:31+5:302024-09-17T18:47:44+5:30

मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता अजित पवारांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

upcoming assembly elections will be fought under the leadership of eknath shinde said dcm ajit pawar | आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले

आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले

पुणे: पहिल्यांदा महायुतीच सरकार आणण्याचा आमचे प्रयत्न असणार आहे. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ,तसेच आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती,अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती देखील केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता पवार म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांना वाटत असते की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, पण सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही. पण मुख्यमंत्रीपदाबाबत १४५ चा मॅजिक आकडा पार करावा लागतो आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार राजाच्या हातात असते की कोणाला मतदान करायचे.  

राज्यातील जनतेने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आणि आज बघता बघता ११ वा दिवस उजाडला आहे.आज गणपतीला निरोप देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे एकच म्हणाव वाटत ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे.थोडेसे मन जड झाले आहे. आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगले काम केले आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Web Title: upcoming assembly elections will be fought under the leadership of eknath shinde said dcm ajit pawar