मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणीत थांबविली; गोंधळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:37 IST2026-01-16T20:36:27+5:302026-01-16T20:37:54+5:30

PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Leading: पुणे मनपा प्रभाग ९ निकाल २०२६: अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे आघाडीवर. मोजणी केंद्रावर तणाव निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबली. पाहा ताजी आकडेवारी.

PMC PCMC Result 2026 Big news! Counting of votes in Amol Balwadkar's ward 9 stopped; chaos ensues | मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणीत थांबविली; गोंधळ सुरू

मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणीत थांबविली; गोंधळ सुरू

पुणे: पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये निकालाची चुरस शिगेला पोहोचली असतानाच मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोजणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. 

प्रभाग ९ ची मोजणी थांबविण्यात आली आहे. अमोल बालवडकर 5 फेऱ्यानंतर 3600 मतांनी आघाडीवर आहेत.  भाजपचे लहू बालवडकर पिछाडीवर आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे पाचव्या फेरी अखेर आघाडीवर आले असून  1315 मतांची आघाडी घेतली आहे.  गणेश कळमकर (भाजप) हे पिछाडीवर गेले आहेत. 

बाणेर आणि बालेवाडी या भागातील मोजणी पूर्ण झाली असून, येथे बालवडकरांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी पाचव्या फेरीअखेर १३१५ मतांची आघाडी मिळवत भाजपच्या गणेश कळमकर यांना मागे टाकले आहे.

Web Title : अमोल बालवडकर के वार्ड में मतगणना रुकी; हंगामा शुरू।

Web Summary : पुणे के वार्ड 9 में राकांपा और भाजपा कार्यकर्ताओं के बीच अशांति के कारण मतगणना रुकी। अमोल बालवडकर पांच राउंड के बाद आगे। राकांपा के बाबूराव चांदेरे ने भाजपा के गणेश कलामकर को पीछे छोड़ा।

Web Title : Counting halted in Amol Balwadkar's ward after unrest; chaos ensues.

Web Summary : Pune's Ward 9 vote count paused due to unrest between NCP and BJP workers. Amol Balwadkar leads after five rounds. Baburao Chandere of NCP overtakes BJP's Ganesh Kalamkar in a close contest.