ही आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची नवी अंजली भाभी, ग्लॅमरस सुनैनाची होणार दमदार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 17:20 IST2020-08-23T17:09:29+5:302020-08-23T17:20:57+5:30
पाहा, नव्या अंजली भाभीचे ग्लॅमरस फोटो

गेल्या दशकभरापेक्षाही अधिक काळापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आता एका नव्या चेहºयाची एन्ट्री झालीय. हा नवा चेहरा म्हणजे, अंजली भाभीचा.
होय, अंजली भाभीची भूमिका साकारणा-या नेहा मेहताने मालिकेला रामराम ठोकल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अलिकडे रोशन सिंह सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाारा गुरुचरण सिंह मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आता अंजली भाभीच्या भूमिकेत झळकणा-या नेहा मेहता हिने देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नेहा मेहता गेल्या 12 वर्षांपासून अंजली भाभीची भूमिका साकारत होती. मात्र अचानक तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
नेहा शोमधून आऊट होताच तिच्या जागी सुनैनाची एन्ट्री झाली आहे.
सुनैना एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
2007 मध्ये ‘संतान’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
यानंतर राईट लेफ्ट राईट, मित मिलादे रब्बा, हमसे है लाईफ, यम है हम, बेलनवाली बहू अशा मालिकांमध्ये ती झळकली.
सीआयडी आणि अदालत या क्राईम मिस्ट्री मालिकांमध्येही तिने काम केलेय.
सुनैना ही तिच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखली जाते. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ती अंजली भाभीची भूमिका कशी साकारते, ते बघूच