प्रकाशझोतापासून दूर आहे निलेश साबळेची पत्नी; पाहा कशा दिसतात Mrs. Sable

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 10:32 AM2022-01-07T10:32:30+5:302022-01-07T10:35:37+5:30

Nilesh sable wife: २०१० मध्ये निलेश आणि गौरीने साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.

‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात करणारा अभिनेता म्हणजे निलेश साबळे.

उत्तम अभिनेता, लेखक असलेल्या निलेशने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली.

अनेक रिअॅलिटी शो करणाऱ्या निलेशने 'नवरा माझा भवरा' या चित्रपटातही काम केलं आहे. परंतु, त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे.

एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच निलेश एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याने एम एसची पदवी घेतली आहे.

सोशल मीडियावर निलेशची कायमच चर्चा असते. त्यामुळे यात त्याच्या कुटुंबाविषयी, त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

निलेशच्या पत्नीचं नाव गौरी साबळे असून ती सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही.

निलेश आणि गौरीचं लव्ह मॅरेज असल्याचं सांगण्यात येतं. एका कार्यक्रमानिमित्त निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. यावेळी तेथे या दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्री व मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

२०१० मध्ये निलेश आणि गौरीने साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.

गौरी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, नेटकऱ्यांमध्ये तिच्याविषयी कायम चर्चा रंगत असते.