आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:30 IST2022-05-24T12:20:27+5:302022-05-24T12:30:30+5:30
Aadesh bandekar:उत्तम अभिनेता ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावजी असा प्रवास करणारे आदेश बांदेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, सूत्रसंचालक म्हणजे आदेश बांदेकर. गेल्या कित्येक वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आज त्यांनी कलाविश्वात त्यांची स्वतंत्र ओळख आणि हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
उत्तम अभिनेता ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावजी असा प्रवास करणारे आदेश बांदेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
आदेश बांदेकर यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी व मुलगादेखील कलाविश्वात सक्रीय आहेत.
आदेश बांदेकर यांच्या पत्नीचं नाव सुचित्रा बांदेकर व मुलाचं नाव सोहम असं आहे.
कलाविश्वात सक्रीय असलेले हे कुटुंब खऱ्या आयुष्यात अत्यंत साधेपणाने राहतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
अलिकडेच झी मराठीने आदेश बांदेकर यांच्या घराचा एक व्हिडीओ शेअर केला. यात त्यांच्या घराची लहानशी झलक पाहायला मिळत आहे.
आदेश बांदेकर यांच्या घरी एक पाळीव श्वान असून त्याच नाव सिंबा असल्याचं म्हटलं जातं.
आदेश बांदेकर यांचं घर अत्यंत सुंदर पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे.
बांदेकरांच्या घरी प्रत्येक सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात.
घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा सुचित्रा बांदेकर यांनी विचारपूर्वक सजवला आहे.