काळजावर घाव! बारामतीचा पठ्ठ्या करतोय तरुणींच्या मनावर राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:58 IST2021-09-03T16:50:02+5:302021-09-03T16:58:33+5:30

Vibhav chavan : मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा वैभव चव्हाण बारामतीचा असून या मालिकेतील त्याचा अभिनय अनेकांची मन जिंकत आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मन झालं बाजिंद' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

'मन झालं बाजिंद' या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात आणि वैभव चव्हाण मुख्य भूमिका साकारत आहेत.

मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा वैभव चव्हाण बारामतीचा असून या मालिकेतील त्याचा अभिनय अनेकांची मन जिंकत आहे.

रांगडा स्वभाव आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे वैभव अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत बनत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वैभवने मन झालं बाजिंद या मालिकेपूर्वी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतही काम केलं आहे. या मालिकेत त्याने मुहम्मद तुर्की ही भूमिका साकारली होती.

वैभव फिटनेस फ्रिक असून इन्स्टाग्रामवर त्याने वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर केले आहेत.

वैभवला अभिनयाव्यतिरिक्त फोटोग्राफीची विशेष आवड आहे.