Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: संजय राऊतांची दूरदृष्टी, मतदारांची सहानुभूती आणि..., ही आहेत शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या विजयाची कारणे

By बाळकृष्ण परब | Published: November 2, 2021 05:10 PM2021-11-02T17:10:53+5:302021-11-02T17:24:46+5:30

Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेवनेच्या kalaben delkar यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांच्यावर ५१ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. डेलकर यांच्या रूपात महाष्ट्राबाहेरून शिवसेनेचा पहिलाच खासदार निवडून आला आहे.

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेवनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांच्यावर ५१ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. डेलकर यांच्या रूपात महाष्ट्राबाहेरून शिवसेनेचा पहिलाच खासदार निवडून आला आहे.

शिवसेनेला मिळालेल्या या विजयाचे राज्यातील राजकारणावर आणि भाजपाविरोधातील रणनीतीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच सेनेच्या राज्याबाहेरील विस्तारासही मदत होणार आहे. शिवसेनेला राज्याबाहेर दादरा नगर हवेलीमध्ये मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

शिवसेनेला मिळालेल्या या विजयाचे सर्वाधिक श्रेय हे संजय राऊत यांच्या दुरदृष्टीला द्यावे लागेल. त्यांनीच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेत आणून त्यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास राजी केले होते. दादरा नगर हवेलीमध्ये मोहन डेलकर यांच्या प्रभावामुळे ही जागा सहज जिंकता येईल, याचा राऊत यांना विश्वास होता आणि तो आजच्या निकालांमधून खरा ठरला.

दादरा नगर हवेली मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या मोहन डेलकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे डेलकर कुटुंबीयांबाबत मतदारसंघात सहानूभूती निर्माण झाली होती. तसेच या घटनेनंतर शिवसेनेने डेलकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्याचाही पक्षाला फायदा झाला.

दिवंगत मोहन डेलकर यांनी बरीच वर्षे दादरा नगर हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्यांचा येथील मतदारांवर वैयक्तिक चांगला प्रभाव होता. त्यामुळे पक्ष न पाहता त्यांना मतदान होत असे. आताही त्यांच्या पत्नींना या प्रभावाचा फायदा झाला. तसेच त्यांच्या संसयास्पद आत्महत्येचाही मतदारांवर परिणाम झाला.

दादरा नगर हवेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालांमधून भाजपाविरोधातील नाराजी स्पष्टपणे दिसून आली. मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून स्थानिक प्रशासकांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान मतदारांमधील नाराजी ईव्हीएममधून व्यक्त झाली आहे. त्यामुळे कलाबेन डेलकर यांना ५१ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले.

कलाबेन डेलकर यांना ५१ हजारांहून अधिक मताधिक्य दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला. कलाबेन यांना एकूण १ लाख १८ हजार ०३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार ७६६ मतांवर समाधान मानावे लागले.

Read in English