ही आहे 17 व्या लोकसभेतील सर्वात ग्लॅमरस खासदार, सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:03 PM2019-05-27T17:03:19+5:302019-05-27T17:17:55+5:30

नुकत्याच आटोपलेल्या लोकसबा निवडणुकीमध्ये सिनेक्षेत्राशी निगडित अनेक चेहरे खासदार म्हणून निवडून आले आहेत. सिनेक्षेत्राशी संबंधित अशाच ग्लॅमरस चेहऱ्यांपैकी एक म्हणजे मिमी चक्रवर्ती.

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

मिमी चक्रवर्ती यांनी बंगालमधील जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवताना भाजपा नेते अनुपम हजारा यांचा सुमारे तीन लाख मतांनी पराभव केला.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मिमी चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर जोरात आहे. काही नेटिझन त्यांचा उल्लेख 17 व्या लोकसभेतील सर्वात ग्लॅमरस चेहरा म्हणून करत आहेत. मिमी चक्रवर्तीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिमी चक्रवर्ती हातात ग्लव्हज घालून जनतेशी हस्तांदोलन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच त्यावरून मोठा वादही झाला होता. मात्र हाताला झालेल्या जखमेमुळे आपण ग्लव्हज घालून हस्तांदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

30 वर्षांच्या मिमी चक्रवर्ती यांनी 2008 मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. गनेर ओपारे या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती.

मिमी चक्रवर्ती या फेमिना मिस इंडियामध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या. आता राजकारणात पदार्पण केलेल्या मिमी चक्रवर्ती यांचे खेला जोखेन आणि सिंधूर खेला हे चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.