'रानबाजार'मधील बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली तेजस्विनी पंडित, खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:56 PM2022-05-16T17:56:16+5:302022-05-16T18:07:19+5:30

Tejaswini Pandit : मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिची आगामी वेबसीरिज रानबाजारमुळे चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिची आगामी वेबसीरिज रानबाजारमुळे चर्चेत आली आहे.

रानबाजारचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

हा मराठीमधील सगळ्यात बोल्ड टीझर असल्याचे बोलले जात आहे.

रानबाजार या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

तेजस्विनीचा कधी न पाहिलेला लूक यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तेजस्विनीने यापूर्वी बोल्ड लूकमध्ये बऱ्याचदा फोटोशूट केले आहे.

तेजस्विनी पंडित खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.