न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातचा बघा देसी अंदाज, एक से बढकर एक पोज कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 12:02 PM2021-01-04T12:02:41+5:302021-01-04T12:10:21+5:30

सध्या अभिनेत्री मेकओव्हर करत फिटनेस फ्रिक बनत वर्कआऊट करताना दिसतात. वजन कमी केल्याने अधिक सुंदर दिसण्याच्या नादात नको नको ते डाएट वर्कआऊट करताना दिसतात. मात्र याच गोष्टीला अपवाद ठरली आहे अभिनेत्री वनिता खरात. आपण जसे आहोत तसे स्विकारा आणि स्वतःवर प्रेम करा हेच जणू सांगण्याचा प्रयत्न वनिता खरातने केला आहे.

नुकतेच वनिता खरातने स्वतःचा न्युड फोटो शेअर करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

वनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यूड फोटोशूट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा फोटो शेअर करताच वनिता तुफान चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

यापूर्वी वनिताने तिच्या सोज्वळ अंदाजाने सा-यांनाच घायाळ केले होते.

नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचा अशा प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या वेगवेगळ्या लूकची झलक बघायला मिळते.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

वनिताने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.

सोज्वळ अंदाजातही तिने आपल्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

या फोटोत वनिताने नऊवारी साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.