नवरी नटली ! नववधूच्या रुपातील सोनालीवरुन हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:00 AM2020-08-29T06:00:00+5:302020-08-29T06:00:00+5:30

नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये सोनालीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.

सोनालीचे हे मनमोहक रुप कॅमे-यात कैद झाले आहेत.

सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत.

तिच्या या प्रत्येक फोटोवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव होत असतो.

लहेंगा-चोली आणि बांधणीच्या ओढणीत सोनाली अतिशय सुरेख दिसतेय.

सोनाली यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गुड न्युज दिली होती.

तिच्या साखरपुड्याच्या बातमीने तरुणांचा हिरमोड झाला.

ब्राइडल कलेक्शनसाठी सोनालीने हे खास फोटोशूट केले होते.

नववधूच्या रुपातील फोटो पाहून चाहतेही प्रेमात पडतील.

या फोटोंमध्ये नववधूप्रमाणे नटलेला तिचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात सोनाली पाहायला मिळते आहे.

सोशल मीडियावरील सोनालीचे हे फोटो नेहमीच सा-यांचे आकर्षण ठरतात.

लाल लेहंग्यामध्ये सोनाचे सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.