कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:00 AM2022-05-23T07:00:00+5:302022-05-23T07:00:01+5:30

Rujuta deshmukh: तिला एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यावर ती स्वत: २० वर्षीय तरुणी असल्याचा भास होतो.

मराठी कलाविश्वातील गोड आणि तितकीच गुणी अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख. उत्तम अभिनयाच्या जोरावर ऋतुजाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.

'कळत नकळत' या मालिकेच्या माध्यमातून ऋजुताने एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकेनंतर तिचा कलाविश्वात फारसा वावर जाणवला नाही.

ऋजुताने तिचा कलाविश्वातील वावर कमी केला आहे. त्यामुळे ती फार मोजक्या आणि निवडक मालिकांमध्येच दिसून येते.

ऋजुता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिला एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यावर ती स्वत: २० वर्षीय तरुणी असल्याचा भास होतो.

ऋजुता आजही सौंदर्यामध्ये अनेकींवर मात करते. अलिकडेच ऋजुता 'रंग माझा वेगळा' या मालिकेत धळकली होती. या मालिकेत तिच्यासह तिच्या पतीनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याचं दिसून आलं.

'जाऊ नको दूर बाबा' या मालिकेतही ती झळकली आहे. या मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

ऋजुताला एक मुलगी असून साजिरी असं तिचं नाव आहे. अनेकदा आपल्या लेकीसोबतही ती फोटो शेअर करत असते.

ऋजुता देशमुखने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'राजा शिवछत्रपती', 'आभाळमाया', 'तू माझा सांगाती' , 'स्वप्नांच्या पालिकडले' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

सध्या ऋजुता सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत दिसून येत आहे. तसंच तिने 'रायगडाला जेव्हा जग येते' या नाटकात काम केलं असून ते तुफान गाजलं होतं.

ऋजुता 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'एक गाडी बाकी अनाडी', 'नशीबवान' आणि हिंदी चित्रपट 'फॅमिली'मध्येही झळकली आहे.