लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, साडीतील फोटोंतून चाहत्यांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:41 PM2021-09-29T13:41:32+5:302021-09-29T13:49:52+5:30

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

नुकतेच स्वानंदीने साडीतील फोटो शेअर केले आहेत.

साडीतील फोटोत स्वानंदी बेर्डे खूपच सुंदर दिसते आहे.

स्वानंदी बेर्डेने नवा बिझनेस सुरू केला आहे. इहाज् क्रिएशन्स असे तिच्या ब्रॅण्डचे नाव असून त्या अंतर्गत ज्वेलरी आणि गारमेंटचा बिझनेस करणार आहे.

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

स्वानंदी बेर्डेच्या इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले.