कोण आहे आणि काय करतो राखी सावंतचा नवीन बॉयफ्रेन्ड आदिल खान दुर्रानी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:28 PM2022-05-17T17:28:11+5:302022-05-17T17:37:36+5:30

Rakhi Sawant New Boyfriend Adil Khan Durrani: सोशल मीडिया पोस्टपासून ते मीडियापर्यंत राखी सावंतने खुलेआम आदिलबाबत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे.

प्रेम एक अशी भावना आहे जी व्यक्तीला भरपूर आनंद देते. एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. रितेशसोबत वेगळी झाल्यावर राखी सावंतला आदिल खान दुर्रानीच्या रूपात नवा जोडीदार मिळाला आहे. आदिलची साथ मिळाल्यावर राखी फारच आनंदी आहे.

सोशल मीडिया पोस्टपासून ते मीडियापर्यंत राखी सावंतने खुलेआम आदिलबाबत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. राखी सावंतने हे स्पष्ट केलं की, आदिल खान दुर्रानी हा तिचा नवा बॉयफ्रेन्ड आहे आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते.

आता राखी सावंतचा नवा बॉयफ्रेन्ड आदिलची चर्चा होत आहे. फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की, आदिल खान कोण आहे आणि काय करतो? या प्रश्नाचं उत्तरही स्वत: राखीने दिलं आहे. आदिल खान एक बिझनेसमन आहे आणि त्याचा कारचा बिझनेस आहे. त्यासोबतच आदिल इतरही काही बिझनेस आहेत.

आपली नवीन BMW कारबाबत राखीने सांगितलं की, तिला इतकी महागडी लक्झरी कार आदिलनेच गिफ्ट दिली आहे. राखी म्हणाली की, ही कार त्यानेच दिली आहे. माझ्या स्वीटहार्टने कार दिली आहे. राखी म्हणाली, त्याचा कारचा मोठा बिझनेस आहे. तसेच इतरही काही बिझनेस आहेत.

राखी सावंतचा नवा बॉयफ्रेन्ड आदिल गाड्यांचा शौकीन आहे. याचा अंदाज तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून लावू शकता. आदिलने वेगवेगळ्या गाड्यांसोबतचे त्याचे फोटो शेअऱ केले आहेत.

आदिलने जिममधीलही अनेक व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की, राखी सावंतचा नवीन बॉयफ्रेन्ड आदिल बिझनेसमन असण्यासोबतच एक फिटनेस फ्रीकही आहे.

सर्वात खास बाब म्हणजे बिग बॉसचा नवीन सीझन सुरू होण्याआधीच राखी सावंतला नवीन बॉयफ्रेन्ड मिळाला. गेल्या सीझनमध्ये राखीने पती रितेशसोबत शोमध्ये एन्ट्री घेतली होती. तेव्हा पहिल्यांदा राखीच्या पतीला लोकांनी पाहिलं होतं. यावेळी बिग बॉस १६ तारखेपासून सुरू होत आहे.

अशात आता असा प्रश्न उभा राहतो की, बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये राखी सावंत तिच्या नव्या पार्टनरसोबत एन्ट्री घेणार का?