निराशेच्या गर्तेत निखळलेले तारे...सुशांत सिंह राजपूतपूर्वी या कलाकारांनी केली आत्महत्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:35 PM2020-06-15T12:35:25+5:302020-06-15T12:45:39+5:30

सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकूण देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत अगोदर अनेक नामांकित आणि दिग्गज कलाकारांनी आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे

बालिका वधू फेम प्रत्युषानेही आत्महत्या केली होती. २५ वर्षीय प्रत्यूषाने १ एप्रिल २०१६ मध्ये घरात गळफास लावून आयुष्य संपवलं होतं. तीचा मृत्यु 1 अप्रैल 2016 रोजी तीच्या राहत्या घरी अंधेरीत झाला.

प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. 28 डिसेंबर 2019 रोजी कुशल पंजाबीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या ३७ व्या वर्षी कुशलने आत्महत्या करत आयुष्य संपवलं.

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री जिया खानने 4 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. जिया खानने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने ‘गजनी’, ‘हाऊसफूल’ चित्रपटातही काम केलं होतं.

परवीन बॉबीनेदेखील 2005 साली आत्महत्या केली होती. आजारपण आणि एकटेपणाला वैतागून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

Read in English