तापसी पन्नूने शेअर केले नव्या घराचे फोटो, आधुनिक नव्हे तर जुन्या काळाप्रमाणे सजवले आहे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 06:39 PM2021-03-16T18:39:56+5:302021-03-16T18:46:20+5:30

तापसी पन्नूने तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

तापसी पन्नूने तिचे घर जुन्या काळाप्रमाणे सजवले असून तिचे बहीण शगुननेच या घराचे इंटेरिअर केले आहे.

तापसीच्या घरातील टिव्हीला पडदा लावण्यात आला आहे. तसेच सोफा देखील जुन्या काळातील डिझाइनप्रमाणे आहे.

तापसीच्या घराचे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

तापसी सध्या अनुराग कश्यपसोबत दोबारा या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

तापसीच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडल्यामुळे ती काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती.