Jr NTR ते महेश बाबू! साऊथच्या १० सुपरस्टार्सच्या सुपरमॉम; कोणी आहे गायिका तर कोणी हाऊस वाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:49 PM2022-05-11T16:49:10+5:302022-05-11T16:54:41+5:30

South indian actors: जाणून घ्या, दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यांच्या आईविषयी

अल्लू अर्जुन(Allu Arjun) - 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनची आई एक हाऊस वाइफ आहे. निर्मला अल्लू असं त्यांचं नाव असून त्या सोशल मीडियापासून दूर असल्याचं दिसून येतं.

राम चरण(Ram Charan) - दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची आई आणि अभिनेता चिरंजीवी यांची पत्नी सुरेखा कोनिडाला यादेखील अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

थलपति विजय(Thalapathy Vijay) - दाक्षिणात्य सुपरस्टार थलपति विजय याच्या आईचं नाव शोभा चंद्रशेखर आहे. त्या प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर, लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या आहेत.

पवन कल्याण(Pawan Kalyan) - लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यामुळे पवन कल्याण यांचा पूर्णपणे सांभाळ त्यांच्या आईने केला, असं एका मुलाखतीत पवन कल्याण यांनी सांगितलं होतं. त्यांच्या आईचं नाव अंजना देवी आहे.

विशाल(Vishal) - सुपरस्टार विशालच्या आईचं नाव जानकी देवी आहे. हाऊस वाइफ असलेल्या जानकीदेवी चेन्नईमध्ये राहतात.

सूर्या(Suriya) - दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टारच्या यादीत सुर्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सूर्याच्या आईचं नाव लक्ष्मी शिवकुमार आहे. त्या होममेकर आहेत

नागा चैतन्य(Naga Chaitanya) - दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यच्या आईचं नाव लक्ष्मी दग्गुबाती आहे. त्यादेखील हाऊस वाइफ आहेत. तसंच सुपरस्टार व्यंकटेशच्या त्या बहीण आहेत.

महेश बाबू(Mahesh Babu) - बॉलिवूड पदार्पणाविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन सध्या महेश बाबू चर्चेत येत आहे. त्याला टॉलिवूडचा प्रिंसही म्हटलं जातं. महेश बाबूच्या आईचं नाव इंदिरा देवी असून त्या होममेकर आहेत.

प्रभास(Prabhas) - बाहुबली फेम प्रभासच्या आईचं नाव शिवा कुमारी आहे. त्यादेखील हाऊस वाइफ आहेत.

जूनियर एनटीआर(JR NTR) - RRR स्टार ज्युनिअर एनटीआर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. ज्यु. एनटीआरच्या आईचं नाव शालिनी भास्कर राव आहे. त्या गृहिणी आहेत.