बाहुबली ते भल्लालदेव...; जाणून घ्या साऊथच्या या 13 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:26 PM2021-04-29T17:26:30+5:302021-04-29T17:58:08+5:30

बॉलिवूडसोबतच साऊथच्या या सुपरस्टार्सवरही चाहते जीव ओवाळून टाकतात. पण यांच्याबद्दलची ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?

साऊथ फिल्म सेन्सेशन महेश बाबूबद्दल सगळेच जाणतात. पण त्याचे खरे नाव महेश बाबू नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का? महेश बाबूचे खरे नाव महेश घट्टा मानेनी आहे.

साऊथ सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभासचे खरे नाव इतके मोठे आहे की, ते लक्षात ठेवणेही कठीण. त्याचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपति आहे.

बाहुबलीचा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबातीचे खरे नाव रामानायडू दग्गुबाती आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई व अभिनेता धनुष याचे खरे नाव व्यंकटेश प्रभु आहे.

सर्वांचा लाडका साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआरचे नावही लांबलचक आहे. नंदामुरी तारक रामा राव ज्युनिअर असे त्याचे पूर्ण नाव आहे.

थालापती विजय नावाने ओळखला जाणारा तामिळ सुपरस्टारचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे.

अभिनेता पवन कल्याण याचे खरे नाव काय तर कोनिदेला कल्याण बाबू.

साऊथ स्टार सूर्याचे खरे नाव सरवानन शिवकुमार आहे.

तेलगू स्टार चिरंजीवी यांच्या नावात तर चिरंजीवी हा शब्दही येत नाही. त्यांचे खरे नाव कोनिदेला शिवशंकर वारा प्रसाद आहे.

तामिळ सुपरस्टार, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

कमल हासन यांचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले. त्यांचे खरे नाव पार्थसारथी आहे.

मल्याळम सुपरस्टार ममूटी यांचे खरे नाव आहे मुहम्मद कुट्टुी इस्माइल पैनीपरम्बिल.

मोहनलाल यांचे खरे नाव मोहनलाल विश्वनाथन आहे.