माधुरी दीक्षितच्या गुलाबी लेहंग्यातील देसी लूकने चाहत्यांची वाढवली 'धकधक'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:36 PM2021-04-14T15:36:07+5:302021-04-14T15:36:07+5:30

माधुरी दीक्षितने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गुलाबी लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत माधुरी दीक्षित गुलाबी लेहंग्यात खूप सुंदर दिसते आहे. यासोबत डार्क पिंक लिप्स, ड्रॉप डायमंड झुमके आणि नेकपीसने लूक पूर्ण केला.

माधुरी दीक्षितने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, गुलाबी रंगात मी सुंदर. माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत १, ६५,००० रुपये आहे. हा लेहंगा अमित अग्रवालने डिझाईन केला आहे.

माधुरी दीक्षितच्या १९८४ साली अबोध चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती.

८० आणि ९०च्या दशकात माधुरी दीक्षितने अभिनेत्रीसोबत नृत्यांगणा म्हणून ओळख निर्माण केली.

माधुरी दीक्षितने आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

माधुरी दीक्षितला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

माधुरी दीक्षितचे इंस्टाग्रामवर २३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.