सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह असते करीना कपूर-खान, पाहा तिचे Different Looks

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 12:20 PM2021-01-09T12:20:19+5:302021-01-09T12:28:20+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.

16 वर्षांपूर्वी करीनाने अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. जसजसे करीनाचे करिअर पुढे जाऊ लागले, तसतशी तिच्या यशस्वी सिनेमांची संख्या वाढू लागली.

'कभी खुशी कभी गम', 'जब वी मेट', 'गोलमाल 3', 'बॉडीगार्ड', 'हीरोइन', '3 इडियट्स', 'सिंघम रिटर्न्स' यासह बरेच हिट सिनेमे करीनाच्या नावी जमा आहेत.

बॉलिवूडमध्ये करीनाने जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. शिवाय करिअरमध्ये तिने सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्सह ब-याच अवॉर्ड्सवर आपली मोहोर उमटवली.

करीना सोशल नेटवर्किंग साइट्सवर नेहमी सक्रिय असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच फोटो शेअर करत असते.

यापैकी काही फोटोंमध्ये ती तिचा पती सैफ अली खानसोबत दिसते. करीना आपल्या आयुष्यातील अनेक क्षण कॅमे-यात कैद करत असते.

इंस्टाग्रामवर उपलब्ध असेलल्या फोटोंमध्ये करीना वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे.

काही फोटोंमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये तर काहींमध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.

करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आम्ही तिची काही खास फोटो घेतली आहेत.

तिच्या वेगवेगळ्या लूक्ससोबतचे तिचा हटके अंदाजसुद्धा पाहायला मिळत आहे.

झिरो फिगरसाठीही बेबी प्रसिद्ध होती.

सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.

तैमूरसह एन्जॉय करत वेधून घेते चाहत्यांचे लक्ष