आता अशी दिसते उर्मिला मातोंडकर, जाणून घ्या 'ती' सध्या काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:18 PM2020-09-09T12:18:38+5:302020-09-09T12:30:15+5:30

छम्मा छम्मा करत मासूम गर्ल, मस्त गर्ल, रंगीला गर्ल अशी कितीतरी नावं रसिकांची तिनं मिळवली...ती म्हणजे सा-यांची लाडकी मराठमोळी मुलगी उर्मिला मातोंडकर. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून लांब आहे. काळानुसार तिच्या दिसण्यातही मोठा बदल झाला आहे.

'आजोबा' सिनेमातून उर्मिलाच्या मराठीप्रेमासोबतच प्राणीप्रेमही रसिकांनी अनुभवलं.

गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं लाइमलाइटपासून दूर राहून आपले खासगी आयुष्य एन्जॉय करतेय.

सोशल मीडियावरही ती सक्रिय असते तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.

तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरदेखील उर्मिलाचा चार्म पुर्वीएवढाच कायम आहे.

वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने 9 वर्षांनी लहान असलेला उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती.

याच काळात तिच्या आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तीमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले.

ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.

उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने.

राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही.

याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही.

याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली.