Mumbai Cruise Drug Case: "चित्रपटसृष्टी हाय प्रोफाईल असल्याची शिक्षा भोगतेय;" Aryan Khan ला Javed Akhtar यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:32 AM2021-10-20T08:32:31+5:302021-10-20T08:41:28+5:30

ड्रग्स प्रकरणी Aryan Khan याला NCB कडून करण्यात आलीये अटक. यापूर्वीही Bollywood च्या अनेक दिग्गजांनी आर्यन खानला दिला होता पाठिंबा.

Mumbai Cruise Drug Case Javed Akhtar Statement Aryan Khan: ड्रग्स प्रकरणी एनसीबी (NCB) कडून आर्यन खआन याला अटक करण्यात आली आहे. आर्यन खान याला झालेल्या अटकेनंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार त्याच्या समर्थनार्थ पुढे आले होते.

तर दुसरीकडे या प्रकरणामुळे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. त्याला आपल्या चित्रपटाचं चित्रिकरणही काही वेळासाठी थांबवावं लागलं आहे. आता बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

एनसीबीनं ड्रग्स प्रकरणी शाहरूख खानच्या मुलाला अटक केली होती. त्याच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे आले होते.काही कलाकारांनी यासंदर्भात वक्तव्य करणं टाळलं आहे. तर काही कलाकार समोर येऊन यासंदर्भात वक्तव्य करत आहेत.

यापूर्वी सुनिल शेट्टी, रविना टंडन, हंसल मेहता, फराह खान, पूजा बेदी, सलमान खान, सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारख्या कलाकारांनीही आर्यनला पाठिंबा दिला होता.

याप्रकरणात आता जावेद अख्तर यांनीदेखील उडी घेतली आहे. "मी पोर्टवर पकडल्या गेलेल्या १ बिलियन डॉलर्सच्या कोकेनबाबत कोणतीही हेडलाईन पाहिली नाही. परंतु दीड लाखाचा चरस का गांजा पकडला गेला तर ही एक नॅशनल न्यूज बनली. चित्रपटसृष्टीला हायप्रोफाईल असण्याची शिक्षा भोगावी लागत आहे," असं जावेद अख्तर म्हणाले.

यापूर्वी आर्यन खानच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी करत शिवसेनेनेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसंच मुंबईत एनसीबीच्या भूमिकेबाबत चौकशी करण्याची मागणीही केली होती.

आर्यनच्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेने केली.

राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२ नुसार, याचिका दाखल करत, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सीजेआय एनव्ही रमण यांच्याशी या प्रकरणाला, ‘प्राधान्य’ देत हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला.

जवळपास दोन वर्षांपासून चुकीच्या हेतूने एनसीबी पक्षपात करत आहे आणि फिल्म स्टार्स, मॉडेल आणि इतर सेलिब्रिटींना त्रास देत आहे. कलम ३२ नुसार, सर्वोच्च न्यायालय आणि CJI मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची दखल घेण्यास बांधील आहे. जसे की घटनेच्या भाग तीन अंतर्गत हमीदेण्यात आली आहे. ज्याचे NCB उल्लंघन करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

आर्यन खानला १७ रात्र बेकायदेशीरपणे कारागृहात ठेवण्यात आले. हे राज्यघटनेतील जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचंही तिवारी यांनी म्हटलं होतं.

Read in English