चेहऱ्यावर सुरकुत्या, निस्तेज त्वचा अशी झालीय बेबोची अवस्था, फोटो पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 01:32 PM2021-09-04T13:32:06+5:302021-09-04T13:41:15+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग असते. मेकअपमध्येच नाही तर विनामेकअप लूकवरही चाहते फिदा व्हायचे.

ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घ्यायची

रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असायचे.

मात्र आता करिना तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नाहीतर विनामेकअप लूकमुळे चर्चेत आली आहे.

पूर्वी विनामेकअपमध्येही करिना फार सुंदर आणि तितकी ग्लॅमरस दिसायची.

मात्र आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाच्या लूकमध्येही फार फरक पडल्याचे दिसते.

नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी करिना आता पूर्वीप्रमाणे जास्त सुंदर दिसत नाही.

नुकतेच मीडियाच्या कॅमऱ्या करिना कैद झाली. यावेळी तिचा विनामेकअप लूक समोर आला.

चेहऱ्यावर सुरकुत्या, निस्तेज त्वचा, त्यात सुजलेला चेहरा पाहून तुम्हालाही बेबोमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्य वाटेल.

करिना खूप थकल्यासारखीही दिसते. पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना आता एनर्जेटीक दिसत नाही.

यापूर्वीही विनामेअकप लूकमुळे करिना कपूर ट्रोल झाली होती.

'तू आता म्हातारी झाली आहेस', 'आता तरी डाएट करणं बंद कर' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते.