फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:01 PM2019-01-09T20:01:38+5:302019-01-09T20:07:57+5:30

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.

फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते.

आता हे दोघे लग्न कधी करतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली.

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला.

त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या असून यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र अद्याप या गोष्टीला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघेही नक्कीच पुढचा विचार करतील.

फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.