IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:26 PM2021-01-30T17:26:29+5:302021-01-30T17:32:43+5:30

ट्रेंडिंग कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठीही त्यांचे चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघे एकत्र डिनर डेटसाठी गेले त्यावेळचा त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.

बॉलिवूडमधील रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही.

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.

बॉलीवुडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंह हे कपल मीडियापासून चोरी चोरी चुपके चुपके डेटसाठी घरातून बाहेर पडले.

घरातून बाहेर पडताच मीडियाच्या कॅमे-यांनीही त्यांना त्यांच्या कॅमे-यात कैद केलेच.

शूटिंगमध्ये सतत बिझी असल्यामुळे दोघांनाही एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही.

त्यामुळे निवांत वेळ मिळताच हे कपल अशा प्रकारे प्लॅनिंग करत एकत्र वेळ एन्जॉय करताना दिसतात.

लेट नाईट डेटवर जातानाचा त्यांचा हा फोटो आहे. यावेळी दोघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला.

कोरोनाची भीती अजूनही असल्यामुळे खबरदारी म्हणून चेह-यावर मास्कही दोघांनी लावले होते.

दोघेही नेहमीच त्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. मग ते बॉलिवूड पार्टीला जाणे असो किंवा मग कोणते अन्य कार्यक्रमाला जाणे असो तिथे त्यांच्या स्टालिश लूकने नजरा नाही खिळल्या तर नवलच.