बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:44 PM2021-10-03T12:44:39+5:302021-10-03T12:54:25+5:30

Samantha ruth prabhu: या अभिनेत्याने बॉलिवूडमधील 'रंग दे बसंती' या चित्रपटातही काम केलं आहे.

लोकप्रिय दाक्षिणात्य जोडी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य लवकरच विभक्त होणार आहेत.

चार वर्षांपूर्वी ग्रँड वेडिंग करणाऱ्या या जोडीच्या वैवाहिक जीवनात चढउतार आल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांनी जाहीरपणे चाहत्यांना माहिती दिली.

समंथा आणि नागा चैतन्य दोघंही लोकप्रिय कलाकार असून वेल सेटल्ड आहेत.त्यामुळेच त्यांची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.

समंथा आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वी दोघंही कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकारांना डेट करत होते.

नागा चैतन्य कमल हासन यांच्या लेकीला श्रुती हासनला डेट करत होता. २०१३ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने त्यांची ओळख झाली होती.

श्रुती आणि नागा चैतन्य यांच्या अफेअरची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. हे दोघं लग्न करणार असंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला.

तर समंथादेखील तिच्या अफेअर्समुळे चर्चेत होती.

समंथा प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थला डेट करत होती.

सिद्धार्थने बॉलिवूडमधील 'रंग दे बसंती' या चित्रपटातही काम केलं आहे.

विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि श्रुती हासनदेखील एकमेकांना डेट करत होते. मात्र, श्रुतीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं मन समंथावर जडलं.

समंथा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळे ते बराच काळ लिव्ह इनमध्येदेखील राहत होते.

सिद्धार्थ आणि समंथा यांचं रिलेशनदेखील फार कमी काळ टिकलं. त्यानंतर समंथाने नागा चैतन्यला डेट करण्यास सुरुवात केली.

२०१६ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य डेट करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता.