अंकिता लोखंडेचे फोटो पाहिले असतीलच, तिच्या बहिणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 03:46 PM2021-10-17T15:46:00+5:302021-10-17T15:52:40+5:30

अंकिता टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे तर आशिता मॉडेल. काहीच महिन्यांपूर्वी तिने ग्लॅमरस फोटोशूट करत मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला होता.

या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरचे तिचे फोटो लक्ष वेधून घेतात. पण याच अंकिताची बहिण सुद्धा सोशल मीडियावर तेवढीच अ‍ॅक्टिव्ह आहे.

होय, अंकिताच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. पण अंकिताची बहिण सुद्धा कमी सुंदर नाही. आज आम्ही तिच्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहेत.

अंकिता लोखंडेच्या बहिणीचं नाव आशिता शाहू आहे. होय, ती अंकिताची चुलत बहीण. पण दोघींमधला बॉन्ड फारच स्ट्रॉन्ग आहे.

अंकितासोबतचे अनेक फोटो आशिता शेअर करत असते. दोघींमध्ये सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम आहे.

अंकिता टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे तर आशिता मॉडेल. काहीच महिन्यांपूर्वी तिने ग्लॅमरस फोटोशूट करत मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला होता.

आशिताने फोटोशूट केल्यानंतर अंकिताने एक इमोशनल पोस्ट तिच्यासाठी लिहिली होती. अंकिताने तिचं ग्लॅमरस जगतात स्वागत केलं होतं.

नेहमीच आपल्या आई वडिलांना गर्व वाटावं असं काम कर,असा प्रेमळ सल्ला अंकिताने आशिताला दिला होता.

आशिता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.