After Simmba’s success सारा अली खानचा आनंद गगणात मावेना,मंदिराबाहेर वाटली मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:51 PM2018-12-30T12:51:12+5:302018-12-30T12:59:41+5:30

'सिम्बा' सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आहे.सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे.

सारा मंदिरातून बाहेर येताच चाहत्यांनी तिला घेरले. साराने कुणालाही निराश केले नाही. तिने मुलांसोबत फोटो काढले आणि चाहत्यांसोबत सेल्फीही क्लिक केला.

साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमाच्या रिलीजपुर्वी साराने मंदिरात जाऊन चाहत्यांना मिठाई वाटली होती.

सारासोबत आई अमृता सिंह ही मंदिरात आली होती.

रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या सिनेमामध्ये सारा अली खान, रणवीर सिंह, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिध्दार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात अक्षय कुमारने कॅमिओ केला आहे.