दिशा पटानी ते सारा अली खानपर्यंत...बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत या अभिनेत्रींनी केली होती एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:55 PM2020-06-18T19:55:11+5:302020-06-18T19:55:11+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत कित्येक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सुशांतसोबत दिशा पटानीने एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून सुरूवात केली होती.

सारा अली खानने अभिषेक कपूरचा चित्रपट केदारनाथमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

सारा अली खानने सुशांतसोबत करियरची सुरूवात केली होती. 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या पूर परिस्थितीवर आधारीत हा चित्रपट आहे.

सुशांत सिंग राजपूतने कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राचा पहिला सिनेमा दिल बेचारामध्ये झळकणार होता. हा चित्रपट 'फॉल्ट इन आवर स्टार’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये करियरची सुरूवात शुद्ध देसी रोमांस सिनेमातून केली होती. यातील सुशांत व वाणीची सिझलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.