Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात मतदान संथगतीने; पहिल्या ४ तासात १६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:39 IST2019-10-21T13:29:04+5:302019-10-21T13:39:25+5:30

सकाळपासूनच मतदानाची गती तशी संथ होती.

Maharashtra Election 2019 : Voting in Parbhani district is slow; 16 % voting in the first 4 hours | Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात मतदान संथगतीने; पहिल्या ४ तासात १६ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात मतदान संथगतीने; पहिल्या ४ तासात १६ टक्के मतदान

परभणी : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेर्यंत १६ टक्के मतदान झाले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मतदानाचा गती संथ असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघामध्ये २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदानाची गती तशी संथ होती.  सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी प्राप्त झाली असून, त्यात जिंतूर विधानसभा मतदार संघात १९ टक्के, परभणी विधानसभा मतदार संघात १६.८३, गंगाखेड विधानसभा मतदार संघात १३.८९ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात १६.४६ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान सकाळपासूनच जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे पहावयास मिळाले. सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असून दुपारनंतर मतदान वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Voting in Parbhani district is slow; 16 % voting in the first 4 hours