एकाच उमेदवाराला दाेनदा हरविले, तरी भाजपाने तिकीट कापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 05:48 IST2024-04-12T05:48:02+5:302024-04-12T05:48:34+5:30

त्याचवेळी स्पष्ट झाले हाेते, की त्या यावेळी लाेकसभा निवडणूक लढणार नाही. 

Even though the same candidate lost both times, BJP won the ticket kiran kher | एकाच उमेदवाराला दाेनदा हरविले, तरी भाजपाने तिकीट कापलं

एकाच उमेदवाराला दाेनदा हरविले, तरी भाजपाने तिकीट कापलं

बलवंत तक्षक

चंडीगड : भाजपने चंडीगडमधून अभिनेत्री व विद्यमान खासदार किरण खेर यांना उमेदवारी नाकारली. सलग दाेन वेळा निवडणूक जिंकणाऱ्या किरण खेर यांनी काॅंग्रेसचे नेते पवन बंसल यांना दाेन्ही वेळा पराभूत केले हाेते. मात्र, यावेळी एका कार्यक्रमादरम्यान किरण खेर यांनी स्वत: सांगितले हाेते की, मी यापुढे खासदार म्हणून नाही तर, एक व्यक्ती म्हणून सहभागी हाेईन. त्याचवेळी स्पष्ट झाले हाेते, की त्या यावेळी लाेकसभा निवडणूक लढणार नाही. 

चंडीगडमध्ये महापाैर निवडणुकीवरुन वाद निर्माण झाला हाेता. तेथे आप आणि काॅंग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे यावेळीची निवडणूक साेपी राहणार नाही, याचा त्यांना अंदाज आला असावा. स्थानिक खासदार म्हणून त्यांनी चंडीगडसाठी जास्त वेळ दिला नाही, अशी टीकाही त्यांच्यावर झाली. 

Web Title: Even though the same candidate lost both times, BJP won the ticket kiran kher