कळवणला पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:26 PM2019-10-14T16:26:40+5:302019-10-14T16:28:50+5:30

कळवण : तालुक्यातील मानूर व जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्था कळवण यांच्या सयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती पथनाट्य कार्यक्र म घेण्यात आला.

Voting awareness through a platform for reporting | कळवणला पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

कळवणला पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती

Next

कळवण : तालुक्यातील मानूर व जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्था कळवण यांच्या सयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती पथनाट्य कार्यक्र म घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी कळवण बस स्थानक, गांधी चौक, फुलबाई चौक, मराठी शाळा ओतूर रोड, मानूर ग्रामपंचायत या परिसरात पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. विधानसभेचे मतदान २१ आॅक्टोबर रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हा,े लोकशाहीचा धागा हो, आपल्या मताचे आहे दान लोकशाहीची शान’ अशा घोषणा दिल्या. कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विनीत मालपुरे यांनी केले. नम्रता निकुंभ, अश्विनी पवार, नेहा भालेराव, रेवती ठाकरे, जागृती गांगुर्डे, पूजा बर्वे, प्रियंका आहेर, कुणाला घोलप हे विद्यार्थी पथनाट्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. कैलास खैरनार, रासोयो कार्यक्र म अधिकारी प्रा.विक्र म साबळे प्रा.संदीप पवार प्रा.संदीप देवरे , आर.के.भोये ईतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हा क्र ीडा अधिकारी रविंद्र नाईक ,नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धीरज मालपुरे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Voting awareness through a platform for reporting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.