Nashik Municipal Election Result 2026 : प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:03 IST2026-01-24T14:02:42+5:302026-01-24T14:03:27+5:30

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेचं आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून सक्षम चेहऱ्यांची निवड करण्याबाबतची प्राथमिक चाचपणी सुरु असली तरी अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडूनच घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Nashik Municipal Election Result 2026 After Republic Day, the Chief Minister will decide the Mayor of Nashik | Nashik Municipal Election Result 2026 : प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग

Nashik Municipal Election Result 2026 : प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग

नाशिक - महापालिकेचं आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून सक्षम चेहऱ्यांची निवड करण्याबाबतची प्राथमिक चाचपणी सुरु असली तरी अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडूनच घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कुंभमेळामंत्री तथा भाजप नेते रविवारी (दि. २५) रात्री शहरात दाखल होणार असून, सोमवारी (दि. २६) प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करणार आहे. त्यानंतर महापौरपदाच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तर दावोस येथील परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील रविवारी मुंबईत परतणार असून महापौरपदाच्या उमेदवारीवर तेच शिक्कामोर्तब करणार आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून गटनोंदणीसंदर्भात वेट अँड वॉच केला जात आहे. श्रेष्ठींकडून याबाबत भाजप महानगरकडून माहिती देण्यात आली असून, आता पुढील आदेशाची स्थानिक नेत्यांना प्रतिक्षा आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या मोठ्या महापालिकेतील महायुती आणि महापौरपदाच्या निवडी संदर्भात राजकीय खलबते सुरू आहेत. यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच नाशिककडे श्रेष्ठींकडून लक्ष घातले आईल, असे बोलले जात आहे. नाशिकमध्ये भाजपला बहुमत असल्याने महापौरपदाची श्रेष्ठींना चिंता नसली तरी ही निवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक नगरसेविका दावेदार असल्याने महापौरपदासाठी उमेदवार ठरवताना पक्षाची डोकेदुखी होणार आहे. मात्र असे असले तरी पक्ष ज्येष्ठता, पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामगिरी, वरिष्ठ नेतृत्वाशी जवळीक आणि शिफारसी या बाबी निर्मायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. महापौरपदावरून भाजपत नाराजी नाट्य देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे

उमेदवारीसाठी नेत्यांच्या भेटीगाठी

महापौरपद सर्वसाधारण महिला गटाकरिता जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये घडामोडी पडण्यास सुरुवात झाली आहे. निवडून आलेल्या महिलांचे पती, नातेवाईक, पक्षश्रेष्ठी, आमदार, वरिष्ठ नेते आणि संघटनात्मक नेतृत्वाकडे संपर्क करण्यास सुरुवात झाली असून, पक्षात लॉबिंगला सुरुवात झाली आहे.
 

Web Title : गणतंत्र दिवस के बाद मुख्यमंत्री तय करेंगे नाशिक के महापौर

Web Summary : आरक्षण घोषणा के बाद, भाजपा नाशिक महापौर के लिए उम्मीदवारों का आकलन शुरू करती है। अंतिम निर्णय गणतंत्र दिवस के बाद मुख्यमंत्री फडणवीस पर निर्भर करता है। प्रतिष्ठित पद चाहने वाले पार्षदों के बीच लॉबिंग तेज हो गई है, जिसमें वरिष्ठ नेता चयन प्रक्रिया में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं।

Web Title : Nashik Mayor to be Decided by CM Post Republic Day

Web Summary : Following reservation announcement, BJP starts assessing candidates for Nashik Mayor. The final decision rests with Chief Minister Fadnavis after Republic Day. Lobbying intensifies among corporators seeking the coveted post, with senior leaders playing a key role in the selection process.