इगतपुरी तालुक्यात धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:53 PM2021-07-21T23:53:46+5:302021-07-22T01:19:45+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरावठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Heavy rain in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात धुवाधार पाऊस

इगतपुरी तालुक्यात धुवाधार पाऊस

Next
ठळक मुद्देघोटीसह परिसरात २४ तास वीजपुरवठा खंडित




घोटी : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरावठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इगतपुरी, घोटी परिसरात बुधवारी (दि.२१) तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरू होता. रात्रभर पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर असल्याने बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन घोटी, इगतपुरी बाजारपेठेतही सामसूम होती.
गेल्या चोवीस तासापासून घोटी शहरासह ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. विजेवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणा, बँक, पतसंस्था, गिरण्या आदींचे काम ठप्प झाले आहे.

Web Title: Heavy rain in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.