राष्टवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन युतीला फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:05 AM2019-05-24T01:05:52+5:302019-05-24T01:06:15+5:30

अपेक्षेप्रमाणे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना निफाड तालुक्याने आघाडी दिली आहे. यंदा मोदी लाट सुप्त होती हेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

 The collapse of the Nationalist Congress Party is beneficial to the alliance | राष्टवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन युतीला फायदेशीर

राष्टवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन युतीला फायदेशीर

Next

अपेक्षेप्रमाणे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना निफाड तालुक्याने आघाडी दिली आहे. यंदा मोदी लाट सुप्त होती हेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक चर्चेचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे शेतीप्रधान निफाड विधानसभा मतदारसंघ होय. गेल्या तीन निवडणुकीत ज्या उमेदवाराला तालुक्यातून आघाडी तोच विजयी असे समीकरण झाले आहे. यंदादेखील डॉ. भारती पवार यांना मिळालेली आघाडी पाहता निफाड युतीचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले.
२००९ आणि २०१४मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांना अनुक्रमे ३१ आणि ६१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा ते काही प्रमाणात कमी झाले असले तरी त्याला इतर राष्ट्रीय व स्थानिक कारणं आहेत. वंचित बहुजन आघाडीची निर्मिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन आणि विरोधकांनी केलेला प्रचार अपयशी ठरला आहे. राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रात निफाड विधानसभेमधील गेल्या दशकभराचे राजकारण आमदार अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्या गटाभोवती फिरते. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षीय जाळे प्रत्येक गटात पसरले असल्याने त्याचा फायदा पक्षाला होताना दिसतो, तर पिंपळगाव बाजार समिती आणि शरद पवारांना मानणाऱ्या वर्गामुळे राष्ट्रवादी येथे पाय रोवून आहे. येथील लोकसभेचा उमेदवार कुणीही असो राजकारण हे दोघांभोवतीच फिरते. भाजपची तालुक्यातील पक्ष बांधणी दिसत नसली तरी कार्यकर्त्यांकडे असलेली गाव, त्यांनी घरोघरी केलेला प्रचाराने पवारांना आघाडी मिळाली.
दिलीप बनकर सभापती असलेल्या बाजार समितीत शेतकऱ्यांनी पन्नास पैशांचा मुद्दा चर्चेत आणला, तर अनेकांनी गील पराभव डोक्यात ठेवत भारती पवारांच्या पारड्यात वजन टाकले.
या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
निफाड विधानसभा सर्वसाधारण असल्याने निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे असतात. यंदादेखील सेना आणि राष्टÑवादीत सामना रंगेल असे चित्र दिसत आहे. एकंदरीत
भाजप उमेदवारामुळे युतीला आपला धर्म पाळण्याचा आदेश हायकमांडकडून पुन्हा दिला जाईल. असले तरी मोदींच्या सभेत व्हीआयपी कक्षेत बसलेली राष्ट्रवादीतील श्रीमंत लॉबी आणि इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले काही स्थानिक प्रतिनिधी युतीचा धर्म विधानसभेला पाळतील का हा खरा प्रश्न आहे.


 

Web Title:  The collapse of the Nationalist Congress Party is beneficial to the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.