थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

By Sandeep.bhalerao | Published: October 12, 2019 12:21 AM2019-10-12T00:21:24+5:302019-10-12T00:23:14+5:30

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.

Challenge Gholap with a direct fight | थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्दे देवळालीत तीस वर्षानंतर बदलत्या समीकरणाने चुरस

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे. त्यांचे हे काम यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे आपसूकच घडून येईल, असे मनसुबे आखले गेले मात्र वंचित आघाडी मतदारसंघात किती मुसंडी मारणार यावरही बरेचकाही अवलंबून असणार आहे.
घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधलेल्या सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादीकडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरू शकते. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्या किती लोकांपर्यंत पोहोचू शकतात हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणारा आहे. लक्ष्मण मंडाले यांना राष्टÑवादीची उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी केलेल्या तयारीमुळे मनसेकडून रिंगणात असलेल्या त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदानही राष्टÑवादीचे समीकरण बिघडवू शकतात.
बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात अन्य उमेदवारांची दमछाक होऊ शकते. अर्थात मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे.

मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
नासाका आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबिंत प्रश्न.
४बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यास अपयश.
४ग्रामीण भागाला तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतीक्षा.
४पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प नाही.
४व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा मुद्दा.
मतविभागणी होण्याची शक्यता कमीच
देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.
४घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे पक्ष आलटून-पालटून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे-घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.
बदललेली समीकरणे
सर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. १९७४ पर्यंत नाशिक-देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले.
या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रूपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले.
१९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भिकचंद दोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले आहे. १९९० मध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले.

Web Title: Challenge Gholap with a direct fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.