Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:30 AM2019-10-09T04:30:33+5:302019-10-09T04:32:13+5:30

नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला.

Maharashtra Election 2019: Politics have also changed and Vidhu ... | Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

Next

- रमाकांत पाटील

नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाचा सारीपाट गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे पूर्णत: बदलला आहे. पक्षांतराच्या लाटेत काँग्रेसचे नेते भाजपत आणि शिवसेनेत आले तर भाजपचे आमदार काँग्रेसचे उमेदवार झाल्याने या जिल्ह्यातील राजकारणाचा डावही बदलला असून भिडूही बदलले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा डाव कोण जिंकणार हा एक औत्सुकतेचा विषय ठरला आहे.
नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या जोडीने जिल्ह्यात पाच दशके राजकारणाची सूत्रे हाती ठेवली. आता मात्र हे दोन्ही नेते वयोमानाने थकल्याने त्यांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. विशेष म्हणजे नाईक-गावीतांची मैत्री घट्ट होती. पण या निवडणुकीत त्यांचे वारसदार एकमेकांच्या विरोधात नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसतर्फे शिरीष नाईक तर भाजपतर्फे भरत गावीत हे उमेदवारी करीत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली आहे.
दुसरीकडे पक्षांतराच्या लाटेत अनेक नेत्यांनी दल बदलल्याने विधानसभेची ही निवडणूक जिल्ह्यासाठी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी आहे. जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा आमदार असलेले अ‍ॅड.के.सी. पाडवी हे पुन्हा उमेदवारी करीत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. अर्थात यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा जिंकण्यासाठी रघुवंशी आपली प्रतिष्ठा पूर्णपणाला लावणार त्यामुळे येथील लढतही रंगतदार ठरणार आहे. शहादा मतदारसंघात भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ते मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी हे रिंगणात आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने येथील निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे.

पक्षांतराने रंगत
भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी रातोरात काँग्रेस पक्षात प्रवेश करुन ऐनवेळी आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. याठिकाणी काँग्रेसला सक्षम उमेदवार नव्हता. पण रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी नंदुरबार मतदारसंघातील लढत रंगतदार केली आहे.
आघाडीच्या वाटाघाटीत शहादा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. त्यामुळे जिल्ह्यात या पक्षाचे आता प्रभावी कार्यकर्ते कुणीही नाही. माजी आमदार शरद गावीत हेदेखील नवापूरमधून इच्छुक होते. पण त्यांनीही पक्ष सोडला आणि नवापुरातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
अक्कलकुवा युतीने शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे येथे महिनाभरापूर्वी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपत गेलेले विजय पराडके व किरसिंग वसावे या दोन्ही कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमधून १५ दिवसात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019: Politics have also changed and Vidhu ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.