एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:43 IST2023-03-22T12:43:08+5:302023-03-22T12:43:42+5:30

Ashwini bhave: या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक चढउतार, यश, अनुभव यांवर भाष्य केलं.

marathi actress Ashwini Bhave once used famous actress sarees | एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा

90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे (ashwini bhave). उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर अश्विनी यांनी त्या काळी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. अश्विनी यांचा कलाविश्वातील वावर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहे. यामध्येच सध्या त्यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्या 'दिल के करीब' या फेमस टॉक शोमध्ये अश्विनी भावे यांनी हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक चढउतार, यश, अनुभव यांवर भाष्य केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा आवर्जुन उल्लेख केला. स्मिता तळवलकर उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक व्यक्ती म्हणून त्या किती खऱ्या आणि चांगल्या होत्या हे त्यांनी सांगितलं. हे सांगत असतानाच एकेकाळी मी त्यांच्या साड्या वापरल्या आहेत असा खुलासाही त्यांनी केला.

वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट

"त्या काळात कोणत्याही ऑडिशनला जाताना आम्हाला आमच्याच घरच्या साड्या घेऊन यायला सांगायचे. त्यावेळी कॉच्युम डिझायनर वगैरे हा काही प्रकार नव्हता. तेव्हा स्मिता ताईचा वॉर्डरोब माझ्यासाठी कायम उघडा असायचा. तुला कधीही काहीही लागलं तरी मला सांग असं ती म्हणायची. त्यामुळे मी कित्येक अॅडसाठी किंवा ऑडिशनसाठी स्मिताताईच्या वॉर्डरोबमधील साड्या वापरल्या आहेत. माझ्याकडे तिच्या खूप आठवणी आहेत. खूप छान काळ होता तो", असं अश्विनी भावे  यांनी सांगितलं.

दरम्यान, अश्विनी यांनी मराठीसह हिंदी सिनेमातही काम केलं होतं. त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्यांचा दांडगा वावर आहे.अश्विनी सध्या अमेरिकेत स्थायिक असून त्यांनी किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्न केलं आहे. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: marathi actress Ashwini Bhave once used famous actress sarees