वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:25 IST2021-09-12T15:23:39+5:302021-09-12T15:25:29+5:30
Aishwarya narkar: मराठीच नव्हे तर ऐश्वर्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट
नाटक, मालिका, चित्रपट अशा अनेक माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. केवळ मराठीच नव्हे तर ऐश्वर्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या कायमच सोशल मीडियाचा आधार घेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. त्यातच नुकतंच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने नुकतीचे तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत असून वय हा केवळ आकडाच आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तसंच तिच्या नजरेच्या कटाक्षामुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच 'श्रीमंता घरची सून', 'दुहेरी','रेशीमगाठी','सोनपावले', 'या सुखांनो या','स्वामिनी', 'ये प्यार ना होगा कम','घर की लक्ष्मी बेटीयाँ' अशा असंख्य मालिकांमध्ये ती झळकली आहे.