विना मेकअपही Glamours दिसते तेजश्री प्रधान,पाहा तिचे Real Life Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 09:02 AM2018-06-16T09:02:59+5:302018-06-16T14:32:59+5:30

सुंदर दिसण्यासाठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्वतःच्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात.सौंदर्य... अदा... लूक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं.मात्र रिल ...

Glamours appear to be without make-up, says Prabhadri Pradhan, See Real Life Photo | विना मेकअपही Glamours दिसते तेजश्री प्रधान,पाहा तिचे Real Life Photo

विना मेकअपही Glamours दिसते तेजश्री प्रधान,पाहा तिचे Real Life Photo

googlenewsNext
ंदर दिसण्यासाठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्वतःच्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात.सौंदर्य... अदा... लूक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं.मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात याची अनेकांना उत्सुकता असते.एरव्ही आपल्या मेकअप केलेल्या लूकने सा-यांना घायाळ करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान मात्र विनामेकअप लूकही सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.  तिचा हा विना मेकअप सेल्फी लूक साधा वाटत असला तरीही   भुरळ घालेल असाच आहे.कुणालाही मोहात पाडेल असे या फोटोत तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे.तिच्या सोशल मीडिया पेजवर बिनधास्तपणे स्वतःचे नो मेकअप लूकमधील सेल्फीज पोस्ट कलेले पाहायला मिळतात.तिच्या अशा अनेक विना मेकअप फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळताना पाहायला मिळत आहे.या फोटोंमुळे प्रत्यक्षात तेजश्री विना मेकअप राहणे पसंत करते असे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन समजते.  त्यामुळे मेकअप असो किंवा तेजुचा अंदाज हा चिअरफुल लूक सा-यांची वाहवा मिळवताना पाहायला मिळत आहे.


'होणार सून मी या घरची' या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेनं रसिकांच्या मनावर जादू केली आहे. या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीनं साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे.तेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. होणार सून मी या घरची ही मालिका, ही मालिका संपल्यानंतर अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह कार्टी काळजात घुसली आणि अभिनेता शरमन जोशीसह मैं और तुम या नाटकातून तेजश्री रंगभूमीवर झळकली. याशिवाय ती सध्या काय करते या मराठी सिनेमातही ती झळकली. नुकतंच सूर नवा, ध्यास नवा या मराठी रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाली होती.

तेजुच्या फॅन्ससाठी तिचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे.या फोटोत तेजश्री एका नववधूप्रमाणे नटून बसल्याचे पाहायला मिळते आहे. आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात तेजश्री पाहायला मिळते आहे. या अवतारात तेजश्रीचं सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Web Title: Glamours appear to be without make-up, says Prabhadri Pradhan, See Real Life Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.