ठळक मुद्देमाझ्या खाजगी आयुष्यामुळे मला 10-12 वर्षं काम करता आले नाही. 2014 मध्ये सुशांतचे निधन झाले, त्यावेळी मुलं खूपच लहान होती. त्यांची सगळीच जबाबदारी माझ्या अंगावर होती. मोठा मुलगा शुभम 10 वर्षांचा तर शिष्या फक्त पाच वर्षांची होती.

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या इतर कलाकारांच्या तुलनेत सिद्धार्थ नवखा अभिनेता असला तरी त्याने या चित्रपटात खूप चांगले काम केले होते. सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे असून तो व्ही शांताराम यांचा नातू होता. या चित्रपटासोबत तो काही हिंदी चित्रपटात देखील झळकला होता.

वंश, पहचान, युद्धपथ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसल्याने त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत. पण त्याचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने काजोलच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याच्यावर चित्रीत झालेले छुपाना भी नही आता... हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. चरस हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

सिद्धार्थची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. अक्षयच्या सौंगध या पहिल्या चित्रपटामध्ये शांतिप्रिया नायिका होती. शांतिप्रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी लग्न केले. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. लग्नाच्या पाचच वर्षांत सिद्धार्थचा मृत्यू झाला. शांतिप्रियाने माता की चौकी-कलयुग में भक्ती की शक्ती आणि द्वारकादिश भगवान श्रीकृष्णा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या शांतिप्रिया तिच्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करत आहे. शांतिप्रिया दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची छोटी बहीण आहे. 

शांतिप्रियाला आता अभिनयक्षेत्रातील तिच्या सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. सुशांतच्या निधनानंतर तिने बॉलिवूड, मालिकेत काम करणे खूपच कमी केले होते. याविषयी भास्कर वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ति सांगितले होते की, माझ्या खाजगी आयुष्यामुळे मला 10-12 वर्षं काम करता आले नाही. 2014 मध्ये सुशांतचे निधन झाले, त्यावेळी मुलं खूपच लहान होती. त्यांची सगळीच जबाबदारी माझ्या अंगावर होती. मोठा मुलगा शुभम 10 वर्षांचा तर शिष्या फक्त पाच वर्षांची होती. पण आता मुलं मोठी झाली आहेत. एकाला मॉडलिंगमध्ये तर एकाला स्क्रीन रायटिंगमध्ये रस आहे. ते दोघे लवकरच सेटल होतील. त्यामुळे आता मला पुन्हा एकदा काम करायचे आहे. सिंगल पॅरेंट्स म्हणून मुलांचा सांभाळ करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण या सगळ्यात माझी आई, भाऊ आणि माझी मोठी बहीण भानूप्रिया यांनी खूप मदत केली. 


Web Title: Ashi Hi Banwa Banwi fame Siddharth Ray was married to Actress Shantipriya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.