शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इस्लामची एमआयएमशी जवळीक; असिफ शेख यांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:58 IST2026-01-21T12:58:25+5:302026-01-21T12:58:47+5:30

Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडीत इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एमआयएमशी जवळीक साधल्याची चर्चा आहे.

Malegaon Municipal Election Result 2026 Islam's closeness to AIMIM to keep Shinde Sena out of power | शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इस्लामची एमआयएमशी जवळीक; असिफ शेख यांची खेळी

शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इस्लामची एमआयएमशी जवळीक; असिफ शेख यांची खेळी

प्रवीण साळुंके 

मालेगाव : मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडीत इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एमआयएमशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सक्षम बहुमत तयार होणार असून, एकाच ठिकाणी सत्ता एकवटली जाणार असल्याने त्यादृष्टीने राजकीय गणिते जुळविण्यात येत असल्याची चर्चा मालेगावात सुरू आहे.

येथील महापालिकेत ८४ सदस्य संख्या आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी ४३ सदस्यांची आवश्यकता असते. यंदा झालेल्या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता पुन्हा एकदा हा ४३ चा आकडा गाठण्यात अपयश आले आहे. इस्लामला ३५ मिळाल्या आहेत. त्याखालोखाल एमआयएमला २१, शिंदेसेनेला १८, समाजवादीला ५, कांग्रेसला ३ व भाजपला २ अशा जागा आहेत. त्यात इस्लाम व समाजवादी यांची युती असून, ते मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून ४० जागा मिळवत सत्तेच्या जवळ पोहचल्या आहेत, मात्र, त्यांना बहुमतासाठी आणखी तीन नगरसेवकांची गरज आहे. ३ जागा मिळविलेल्या कांग्रेसने त्यांना पाठिंब्यासाठी आगोदरच होकार दिला आहे. भविष्यातील सत्तेवर येणारे बालंट ओळखून उपाययोजना करण्यास आसिफ शेख यांनी सुरुवात केली आहे.

जर-तर आणि सामाजिक समीकरण

शिंदेसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत, तर एमआयएमला २१ जागा आहेत. या दोचे संख्याबळ ३२ इतके होते. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी ४ सदस्यांची गरज आहे. त्यात भाजपला फक्त २ जागा आहेत. त्यामुळे त्यांना भाजपबरोबरच तीन जागा असलेल्या काँग्रेसला बरोबर घ्यावे लागेल. असे घडले आमदार मुफ्ती यांच्यावर मालेगाव फ्रंटद्वारे जातीयवादी शक्तींशी युती असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळणार आहे. अन् हे आमदार मुफ्ती यांच्या राजकीय कारकिर्दीला परवडणारे नाही. त्यामुळे ते यापासून लांब राहण्याच्या प्रयत्नात आहे, तर एकंदरीत राजकारण पाहता भाजप त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता सुतराम नाही. त्यामुळे ही युती शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

महापौरपदावर दावा

या सत्तास्थापनेच्या खेळात सध्याची परिस्थिती पाहता त्यांना बहुमत गाठणे शक्य होणार आहे. यात स्वतःकडे महापौरपद ठेऊन त्याचा घटकपक्ष असलेल्या समजावादीला, तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला उपमहापौर किंवा महत्त्वाचे स्थायी समिती सभापतीपद विभागून देणे शक्य आहे.

शेख हे मनपाच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून सक्रीय आहेत. येथील मनपाचा मागचा इतिहास पाहता त्यांना शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची आयती संधी मिळाली आहे. ते ही संधी साधण्याच्या प्रयत्नात असून, त्यासाठी त्यांनी पुढील पाऊल उचलले आहे. राजकीय विरोधक एमआयएमला सत्तेत सामील करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

शेख यांनी एक पाऊल मागे घेत एमआयएमचे आमदार मुफ्ती महमंद इस्माइल यांच्याशी बोलणी सुरू केली आहे. या खेळीमुळे पश्चिम भागातील सर्व पक्ष एकत्रित येणार असून, कोणी दगा फटका केला, तर पर्यायही मिळणार आहे. यामुळे पूर्व भागातील शिंदेसेनेचेद्वार आपसूक बंद होणार आहे.
 

Web Title : मालेगाँव में शिंदे सेना को रोकने के लिए इस्लाम पार्टी ने MIM से की नज़दीकी।

Web Summary : मालेगाँव में इस्लाम पार्टी के आसिफ शेख ने शिंदे सेना को सत्ता से बाहर रखने के लिए MIM से गठबंधन की कोशिश की। इस संभावित गठबंधन का लक्ष्य बहुमत प्राप्त करना और स्थानीय राजनीति को नया आकार देना है।

Web Title : Islam Party woos MIM to block Shinde Sena in Malegaon.

Web Summary : Asif Sheikh of Islam Party seeks MIM alliance to keep Shinde Sena out of Malegaon municipal power. This potential coalition aims for a strong majority, consolidating power and reshaping local politics, especially considering past alliances and social equations.