भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:19 IST2026-01-17T14:18:05+5:302026-01-17T14:19:12+5:30

"मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या..."

Was there a match-fixing with BJP? Owaisi spoke clearly after MIM's victory in the state | भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

एक चांगाल निकाल आला आहे. मला आशा आहे की आमचे जे नगरसेवक जिंकूण आले आहेत, ते जनतेच्या आशांवर खरे उतरतील. मी यापूर्व म्हणालो होतो, विजयी होणे आवघड वाडते. मात्र जिंकल्यानंतर आपल्याला लोकांच्या आशांवर खरे उतरावे लागते. त्यांच्यासाठी काम करावे लागते. आपण निवडणुकीदरम्यान जी आश्वासने दिली आहेत, त्यावर कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या," असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.  

ओवेसी म्हणाले, "आपले अनेक हिंदू बंधू, दलीत बंधूही निवडून आले आहेत. मुंबईत मानखूर्द शिवाजीनगर भागात आमचे ६ जण नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. त्या विधानसभेत मतदारसंघात, आठ होते त्यांपैकी ६ जिंकले. यात तीन जण यशस्वी झाले. बीएमसीमध्ये एआयएमआयएमचे ८ जण निवडून आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही आम्हाला मोठे यश मिळाले आहे. तेथे आमचे ३३ जण निवडून आले आहेत. याशिवाय मालेगाव, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, येथेही आमचे उमेदवार जिंकले आहेत. मला आशा आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करू."

ओवेसी पुढे म्हणाले, "तसेच मी जेथे जेथे एआयएमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी पॉलिसी मॅटरमध्ये, पक्षाचा निर्णय होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये. त्यासंदर्भात आपल्यासोबतही चर्चा होईलच. त्यांनंतरच निर्णय घेतला जाईल."

दरम्यान, भाजपवरून आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप होत असतात, आता ते आरोपांवरून प्रश्न निर्माण झाला आहे की, मॅच फिक्स होती भाजपसोबत? असे विचारले असता, "जे आरोप लावतात, हैदराबादमद्ये एक म्हण आहे, गिरे तोभी टांग उपर, आता माझ्याकडे त्याचा काही इलाज नाही. आपण आरोप करा मला काही फरक पडत नाही. मात्र, त्यांना एक गोष्ट समजायल हवी की आपण, हे जे काही बोलत आहात, ज्यांनी आम्हाला निवडून दिले आहे, त्यांना आणखी दुखावाल तर, आपले आणखी नुकसान होईल," असे ओवेसी म्हणाले.


 
 

Web Title : एमआईएम की जीत के बाद ओवैसी का स्पष्टीकरण: क्या बीजेपी के साथ मैच फिक्सिंग थी?

Web Summary : महाराष्ट्र में एमआईएम की चुनावी सफलता के बाद ओवैसी ने बीजेपी के साथ "मैच फिक्सिंग" के आरोपों को संबोधित किया, मतदाताओं की सेवा के महत्व पर जोर दिया और आरोपों को खारिज कर दिया। उन्होंने नवनिर्वाचित सदस्यों से नीतिगत मामलों पर पार्टी से परामर्श करने का आग्रह किया।

Web Title : Owaisi clarifies after MIM's gains: Was there a BJP match-fixing?

Web Summary : Owaisi addressed allegations of a BJP "match-fixing" after MIM's electoral success in Maharashtra, emphasizing the importance of serving constituents and dismissing accusations. He urged newly elected members to consult the party on policy matters.