देवदर्शनासाठी जाताना मुंबईतील तिघांचा अपघाती मृत्यू

By appasaheb.patil | Published: November 17, 2019 10:02 AM2019-11-17T10:02:11+5:302019-11-17T10:12:56+5:30

अक्कलकोटजवळ कार - कंटेनर ट्रकची झाली समोरासमोर धडक; अन्य चार जण जखमी

Accidental death of three persons in Mumbai | देवदर्शनासाठी जाताना मुंबईतील तिघांचा अपघाती मृत्यू

देवदर्शनासाठी जाताना मुंबईतील तिघांचा अपघाती मृत्यू

Next

सोलापूर : देव दर्शनासाठी जात असताना कार व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मुंबईतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. ही घटना अक्कलकोट शहराजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

मुंबई येथील भाविक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमििक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमींना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

Web Title: Accidental death of three persons in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.