कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:14 IST2026-01-22T15:13:03+5:302026-01-22T15:14:18+5:30
KDMC Mayor Reservation Politics, Eknath Shinde Shiv sena: आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. शहराध्यक्ष रवी पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले.

कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण 'अनुसूचित जमाती'साठी (ST) सुटताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रवर्गातील आपल्या नगरसेवकांना इतर पक्षांनी गळाला लावू नये, यासाठी शिवसेनेने तात्काळ पावले उचलली आहेत. शिवसेनेचे कल्याण शहर अध्यक्ष रवी पाटील यांनी आपल्या आरक्षण पात्र नगरसेवकांना सोबत घेऊन 'अज्ञात स्थळी' प्रयाण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. या प्रवर्गातून शिवसेनेचे किरण भांगले आणि हर्षाली मोरे हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी हे दोनच दावेदार असल्याने विरोधी पक्षांकडून (ठाकरे गट किंवा भाजप) त्यांना ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. हीच भीती ओळखून रवी पाटील यांनी या दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे समजते.
शिवसेनेची रणनीती:
निवडून आलेले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना सोबत ठेवण्याची ही जुनी पद्धत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. किरण भांगले की हर्षाली मोरे? यापैकी कोणाचे नाव महापौरपदासाठी निश्चित होते, हे आता थेट निवडीच्या दिवशीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.